कर चुकवून वाहतूक : 18 लाखांची बिअर जप्त
नवापूर : गुजरात राज्यात अवैधरीत्या विक्री जाणारी 18 लाखांची बिअर पोलिसांनी जप्त केली. विसरवाडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप मौल्या गावीत (56) यांनी फिर्याद दिल्यावरून चालक रामकृष्ण पंडीत पाटील (रा.वराड, ता.धरणगाव, जि.जळगाव) व सुनील श्रीराम पाटील (40, रा. बोराडी ता. शिरपुर जि. धुळे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार मध्यप्रदेशकडुन गुजरात राज्यात टाटा अल्ट्रा ट्रकमध्ये ट्रक (एम.एच.19 सी.वाय.2403) मध्ये विना परवाना मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात मद्याची वाहतूक होताना आढळले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप गावीत, चालक विशाल गावीत व सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी ही कारवाई केली.


