कोरोना नियम धाब्यावर : राष्ट्रवादी शहराध्यक्षांसह पाच जणांना अटक


पुणे : कोरोना नियमांचे उल्लंघण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पुणे पोलिसांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह पाच जणांना अटक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील राष्ट्रवादी भवनाचे उद्घाटन कार्यक्रमात प्रचंड गर्दी उसळल्याने रविवारी शिवाजीनगर पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी भाजप नेते प्रचंड आक्रमक झाले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशांत जगताप, प्रदीप देशमुख यांच्यासह एकूण सहा जणांना पोलिसांनी अटक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !