शरद पवारांच्या उपस्थितीत राजधानी दिल्लीत उद्या महत्वपूर्ण बैठक
नवी दिल्ली : आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह सुमारे 20 विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत उद्या मंगळवार, 22 रोजी रालधानी दिल्लीत बैठक होत आहे. राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत विविध अजेंड्यावर तसेच आगामी लोकसभेच्या अधिवेशनाबाबत व देशातील राजकीय परीस्थितीवर चर्चा होईल.
रणनीतीकारांनी दिली पवारांना माहिती
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी यापूर्वीच मुंबईत पवार यांची भेट घेतली व सोमवारी पुन्हा पवार यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत त्यांनी देशात राजकीय परीस्थिती काय आहे याची माहिती त्यांच्याकडे जी उपलब्ध होती ती दिल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.



