डेल्टा प्लसचा धोका : जळगावात नऊ तर राज्यात 21 रुग्ण आढळले


नवी दिल्ली : महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे 21 रुग्ण आढळले असून नऊ जळगाव, सात मुंबई व सिंधुदुर्ग, ठाणे व पालगड जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. महाराष्ट्र सरकारने जीनोम सिक्वेंसिंग करण्याचा निर्णय घेतला असून प्रत्येक जिल्ह्यातून 100 नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 15 मेपासून आतापर्यंत 7500 नमुने घेण्यात आले आहेत, त्यात डेल्टा प्लसची सुमारे 21 प्रकरणे आढळली आहेत, असे राजेश टोपे म्हणाले. दुसरीकडे, केरळच्या दोन जिल्ह्यांमध्ये पलक्कड आणि पथनमथिट्टा या दोन जिल्ह्यातून गोळा झालेल्या नमुन्यांमध्ये सॉर्स-सीओव्ही -2 डेल्टा प्लसची किमान तीन प्रकरणे सापडली आहेत. सोमवारी येथील अधिकार्‍यांनी ही माहिती दिली. पथनमथिट्टामधील जिल्हाधिकारी डॉ. नरसिंहगुरी टी.एल. रेड्डी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कडापारा पंचायत येथील चार वर्षाच्या मुलाला कोरोना व्हायरच्या नवीन डेल्टा-प्लस व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचे आढळले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !