केळी उत्पादकांना हेक्टरी लाखाची मदत मिळावी : माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे जिल्हा भेटीप्रसंगी निवेदनाद्वारे मागणी
भुसावळ : केळी पट्ट्यात आलेल्या वादळी वादळामुळे केळी उत्पादकांच्या हाता-तोंडाशी आलेला हिरावला गेल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. केळी उत्पादकांना धीर देण्यासाठी प्रति हेक्टरी एक लाखांची मदत करावी, अशी मागणी जिल्हा दौर्यावर आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी केली.
नैसर्गिक आपत्तीमुळे 108 कोटींचे नुकसान
निवेदनाचा आशय असा की, यावल-रावेरसह मुक्ताईनगर तालुक्यात केळी उत्पादकांचे महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे सुमारे 108 कोटींचे नुकसान झाले आहे. शेतकर्यांवर मोठे संकट कोसळल्याने त्यांना प्रति हेक्टरी एक लाखाची मदत तत्काळ मिळावी तसेच केळीला फळाचा दर्जा मिळण्याची मागणी करण्यात आली. मागणी संदर्भात सकारात्मक चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन पटोले यांनी दिल्याचे चौधरी कळवतात.