चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा कोयत्याचे वार करीत खून


मांजरोदची घटना : आरोपीला पतीला अटक

शिरपूर : तालुक्यातील मांजरोद येथे चारित्र्याचा संशयावरून 22 वर्षीय विवाहितेच्या पतीने कोयत्याने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी 24 जून 2021 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली आहे. मारेकरी पतीला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली. दर्शना धनगर (22) असे मयत विवाहितेचे नाव आहे. आरोपी पती योगेश सोमा धनगर यास अटक करण्यात आली. याप्रकरणी मयत विवाहितेच्या भावाने थाळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला.

चारीत्र्याच्या संशयावरून केला खून
शिरपूर तालुक्यातील मांजरोद येथे योगेश सोमा धनगर हे पत्नी दर्शना व दोन मुले असे वास्तव्यास होते. गुरुवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास योगेश याने चारीत्र्याच्या संशयावरून वाद घालत पत्नी दर्शना धनगर हिच्यावर मानेवर व डोक्यात कोयत्याने वार केले. त्यात दर्शना धनगर जागीच मयत झाली. खुनाची माहिती गावातील नागरीकांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत थाळनेर पोलिसांना माहिती दिली. पती योगेश सोमा धनगर यास घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यात मयत दर्शना धनगरचा भाऊ मनोज दगा धनगर (रा.टेकवाडे, ता.शिरपूर) यांनी फिर्याद दिल्यावरून योगेश सोमा धनगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश बोरसे हे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !