कापड मार्केट आगीच्या विळख्यात : कोट्यवधींचे नुकसान
धुळे : शहरातील पाचकंदील चौकात महापालिकेच्या शंकर मार्केटला सोमवारी पहाटेच्या सुमारास आग लागल्यानंतर सुमारे 30 दुकाने आगीच्या विळख्यात सापडून कोट्यवधींचे नुकसान झाले. पहाटे आग लागल्याचे लक्षात येताच मनपा अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती कळवण्यात आली. धुळे शहरासह शिरपूर, दोंडाईचा, साक्री, अमळनेर, मालेगाव येथील बंबाच्या मदतीने आग विझवण्यात आली मात्र तो पर्यंत सुमारे दहा कोटींहून अधिक नुकसान झाले. अग्निशमन दल वेळेत आले असते तर बरेच नुकसान टळले असते, असे व्यापार्यांनी यावेळी सांगितले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. पोलिसांनी प्रथमदर्शनी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला.

