ऐकावे ते नवलच ! : पतीला सोडून सासुचा जावयाशी प्रेमविवाह !


मुझफ्फरनगर : पतीला सोडून सासूने आपल्या वयापेक्षा 25 वर्षांनी लहान जावयासोबतच पळून जावून लग्न केल्याची घटना उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगरच्या भौराकलां पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात घडल्याने खळबळ उडाली. तब्बल दहा महिन्यांपासून ही जोडी पसार झाल्यानंतर गावात परतल्यानंतर संबंधिताच्या कुटुंबियांनी या विवाहाला विरोध केल्यानंतर झालेले भांडण थेट पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर शांतता भंग केल्याप्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली..

जावयासोबतच फरार झाली सासू
सूत्रांच्या माहितीनुसार, भौराकलां पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील 50 वर्षीय महिला आपल्यापेक्षा 25 वर्षांनी लहान असलेल्या जावयाच्या प्रेमात पडली व दोघे दहा महिन्यांपूर्वी पसार झाले मात्र बदनामीच्या भीतीने कुणीही तक्रार दिली नाही. दहा महिन्यांनंतर संबंधितानी परत येत कोर्ट मॅरेज केल्याचे सांगितले मात्र संबंधीत महिलेच्या पतीने व मुलीने या लग्नास आक्षेप घेतला व उभयंतांमध्ये चांगलेच कडाक्याचे भांडण झाले. पोलिसांनी ही बाब कळताच दोघांना ठाण्यात आणल्यावर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. भौराकलां पोलीस ठाण्याचे अधिकारी जितेंद्र तेवटिया यांनी सांगितले की, सासू आणि जावयाने एकमेकांपासून वेगळे होण्यास नकार दिला. आम्ही त्यांना दंड ठोठावला आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !