झाडावर वीज पडल्याने दोघांचा मृत्यू ; दोघे जखमी


शिरपूर : पावसासह विजांचा गडगडाट सुरू झाल्याने लिंबाच्या झाडाखाली आडोशाला उभ्या असलेल्या चौघांच्या अंगावर अचानक वीज कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले. शनिवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना कुरखळी गावाजवळील एका शेतात घडली. मनोज सुकलाल कोळी (25) व सुनील सुदाम भील (30) अशी मयतांची नावे आहेत तर समाधान बारकू भील (30) व रवींद्र गुलाब भील (32) हे जखमी झाले असून त्यांना धुळे येथे उपचारार्थ हलवण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !