मोठी बातमी ! : पोलीस दलात 12 हजार 200 पदे भरली जाणार : गृहमंत्र्यांची मोठी घोषणा


औरंगाबाद : महाराष्ट्र पोलीस दलात एकूण 12 हजार 200 पदांची भरती केली जाणार असून, पहिल्या टप्प्यातील पाच हजार 200 पदांची भरती 31 डिसेंबर पूर्वी केली जाईल, अशी मोठी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी येथे केली. गृहमंत्री सध्या औरंगाबादच्या दौर्‍यावर आले असता प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. सोमवारी औरंगाबाद परीक्षेत्राची बैठक झाली. कायदा सुव्यवस्था परीस्थिती, गुन्हे दाखल होण्याचे आणि सिद्ध होण्याचे प्रमाण याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच, कर्मचार्‍यांना चांगली घरे चांगली सुविधा मिळाव्यात याबाबतही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र पोलीस दलात डिसेंबरपूर्वी पाच हजार 200 जागांवर तर त्यानंतर उर्वरित सात हजार पदांची भरती केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !