पोलीस अधिकार्याच्या पत्नीची आत्महत्या
धुळे : कल्याण क्राइम ब्रांचमध्ये पोलिस उपनिरीक्षक असलेल्या अधिकार्याच्या पत्नीने धुळ्यात आत्महत्या केल्याची घटना घडली. नकाणे तलावाजवळ शनिवारी विवाहितेचा मृतदेह आढळला असून त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. रूपाली बळवंत पाटील असे मयत विवाहितेचे नाव आहे. कल्याण येथील गांधी रोड परीसरातून विवाहिता बेपत्ता होत्या. धुळे तालुका पोलिसांना माहिती कळताच ोलिस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक सागर काळे, विजया पवार व कर्मचार्यांचे पथक आले. महिलेच्या मृतदेहाजवळ विषारी औषधाची एक बाटली मिळून आली. हा मृतदेह कल्याण येथून बेपत्ता झालेल्या रूपाली बळवंत पाटील (वय 33, रा. रूम नं. ए/, 305, श्री विहार सोसायटी, लोढा गार्डन जवळ, गांधीरोड, कल्याण,) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. शिवाय त्यांच्या नातलगांनी घटनास्थळी येऊन ओळख पटवली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

