धाडणे शिवारात विहिरीत बुडाल्याने एकाचा मृत्यू
साक्री : तालुक्यातील धाडणे शिवारात विहिरीत बुडून एकाचा मृत्यू झाला. पंडित गायकवाड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी साक्री पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. धाडणे येथील पंडित गुलाब गायकवाड ( वय 65) हे नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. सायंकाळ झाल्यावरही ते परत आले नाही. त्यामुळे त्यांचा शोध सुरू होता. त्यानंतर सकाळी गावातील विनायक अहिरराव यांच्या शेतविहिरीत त्यांचा मृतदेह मिळून आला.

