धुळ्यात दुचाकी चोरट्याकडून पाच दुचाकी जप्त


धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : चोरीची दुचाकी विक्रीपूर्वीच आवळल्या मुसक्या


व्यवसायाने मेकॅनिकल असलेल्या मात्र दुचाकींची चोरी करून त्या कमी किंमतीत विकणार्‍या भामट्याच्या धुळे स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीच्या ताब्यातून शहरातून चोरलेल्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. सईद खान फिरोज खान (28, तिरंगा चौक, नूर मशिदीजवळ, 80 फुटी रोड, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून आझादनगर पोलीस ठाणे हद्दीतील तीन, धुळे शहर व चाळीसगाव रोड पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येकी एक दुचाकी जप्त करण्यात आली. शहरातील शंभर फुटी रस्त्यावरील अलहेरा हायस्कूलजवळ संशयीत चोरीची दुचाकी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून संशयीताला अटक केली.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे निरीक्षक शिवाजी बुधवंत, योगेश राऊत, सुशांत वळवी, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, संदीप थोरात, प्रकाश सोनार, संदीप सरग, योगेश जगताप, किशोर पाटील, मयूर पाटील, तुषार पारधी, विलास पाटील, दीपक पाटील, संजय सुरसे, कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !