पक्षाशी प्रामाणिक राहणे गुन्हा असेल तर हा गुन्हा मी केलाय -एकनाथराव खडसे


भाजपाच्या पहिल्या यादीत नाव न आल्यानंतर खडसेंची प्रतिक्रिया ः दुसर्‍या यादीत नाव येण्याची व्यक्त केली आशा

भुसावळ (अमोल देवरे)-  तब्बल 42 वर्षांपासून भाजपा पक्षाशी प्रामाणिक राहिलो, अनेकदा पक्ष सोडण्याविषयी ऑफर आल्या, दबाव आला मात्र आपण पक्षावर निष्ठा ठेवली व पक्षाशी प्रामाणिक राहिलो. पक्षाशी मी प्रामाणिक राहणे हा गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगरात व्यक्त केली. भाजपाने 125 उमेदवारांची यादी जाहीर केली मात्र त्यात खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्याचे नाव नसल्याने राज्यात खळबळ उडाली. खडसेंपेक्षा ज्युनिअर असलेल्या पदाधिकार्‍यांना भाजपाने पहिल्या यादीत संधी दिली मात्र तब्बल सहा टर्मपासून आमदार राहिलेल्या खडसेंना पहिल्या यादीत स्थान न दिल्याने खडसे समर्थकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

तिकीट सेनेला जाणार याबाबत कल्पना नाही
खडसे म्हणाले की, मंगळवारी मुहूर्तावर अर्ज दाखल केला आहे. आणखी यादी येण्याची शक्यता असून यादीची वाट पाहतोय, असे खडसे यांनी सांगत उमेदवारीबाबत उत्कंठाही दाखवली. मुक्ताईनगरची जागा शिवसेनेला जाणार का ? याबाबत छेडले असता खडसे यांनी आपल्याला ही जागा सेनेला गेली आहे वा जात आहे याबाबत माहिती नसल्याचे ते म्हणाले. गेल्या 25 वर्षांत आदरणीय स्व.गोपीनाथ मुंडे व मी तिकीट वाटपाच्या प्रक्रियेत मी होतो, युती घोषणा तोडण्यासाठी आपल्यावर जवाबदारी टाकण्यात आली होती, अशी आठवणदेखील खडसेंनी प्रसंगी करून देत कालाय तस्मःय नमः, असे म्हणत अधिक बोलण्यास नकार दिला.



खडसेंचा प्रभाव कमी करण्याची खेळी ?
राज्याच्या पटलावर नाव असलेल्या खडसेंवर अलिकडच्या काळात विविधांगी आरोप होवून ते यातून सही-सलामत बाहेर पडले मात्र याचवेळी त्यांनी स्वपक्षावरही टिका करून सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तिकीट वाटप असो की युतीची घोषणा असो की या प्रक्रियेत खडसे कुठेही दिसले नाही त्यामुळे खडसे केवळ पक्षासाठी आता ज्येष्ठ मार्गदर्शक म्हणूनच हवे की काय? असे म्हटल्यास वावगे ठरू नये.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !