यावल शहर व पोलीस ठाणे हद्दीतील 57 गावात 93 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून उद्या श्रींची स्थापना


यावल (रविवार, 13 सप्टेंबर 2026) : यावल शहरात 21 तर ग्रामीण भागात यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 57 गावात 72 मिळून एकूण 93 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून सोमवार, 14 श्रींची उत्साहात स्थापना केली जात आहे. शहरात पाच दिवसांचा तर विविध गावात 6, 9 व 11 दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. शहरात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या उत्साहात गणेश मूर्तींचे आगमन झाले तरी रविवारी रिप-रिप पावसातही मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे सजावट करताना दिसून आले.

72 मंडळांकडून श्रींची होणार स्थापना
शहरात व ग्रामीण भागात श्रींची स्थापनेची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी दुपारनंतर स्थापना करण्यात येणार आहे. या करीता यावल शहरात एक खाजगी तर 20 सार्वजनिक तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या ग्रामीण भागातील 57 गावात एकूण 72 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून उत्सव साजरा करण्यात येत आहे. यावल तालुक्यात गणेशोत्सव साजरा करण्याच्या चार पध्दती आहेत. यामध्ये शहरातील गणेशोत्सव पाच दिवसांचा असतो तर काही गावात सहा दिवस, नऊ दिवस व दहा दिवस अशा पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यात तालुक्यातील यावल शहरासह साकळी, किनगाव, नायगाव, कोरपावली व दहिगाव ही संवेदनाक्षम गावे आहेत.




पोलिसांकडून शांतता समितीची बैठक
तर यंदाच्या गणेशोत्सवात फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहायक पोलीस निरीक्षक अजय वाढवे, पोलीस उपनिरीक्षक मैनोद्दीन सैय्यद, अनिल महाजन, उपनिरीक्षक एम.जे.शेख यांच्या वतीने सर्वच गावात शांतता समितीच्या बैठक घेण्यात आल्या. तसेच संवेदनशील गावात विशेष लक्ष ठेवले जात आहे. श्री स्थापनेनिमित्त शहरातील मुख्य रस्त्यावर श्रींच्या मूर्ती, पूजा-पत्री तसेच आराससाठी लागणारे साहित्याच्या दुकाने थाटली आहेत तर मूर्तीकारांकडून देखील मूर्तींना रंगकाम करून शेवटचा हात फिरवला जात आहे. गेल्या चार दिवसांपासून शहरात मोठ्या मूर्तींचे आगमनदेखील झाले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !