शिरपुरात विवाहितेची गळफास घेत आत्महत्या
शिरपूर : शिंगावे शिवारातील कुणाल सोसायटीतील विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. 17 रोजी ही घअना घडली. संगीता किरण पाटील असे मयत विवाहितेचे नाव आहे. पतीला कामाला गेल्यानंतर महिलेने घरातील दरवाजा आतून बंद करीत आत्महत्या केली. यावेळी घरात केवळ तीन वर्षांचा बालक होता. काही वेळानंतर तो बालक जोर-जोराने रडू लागला़ बराचवेळ रडल्यामुळे घराजवळील व ये-जा करणार्या रहिवाशांना बालक सारखा रडत असल्यामुळे ते त्या घराकडे गेले असता त्यांनी खिडकीतून पाहिला असता आत्महत्येची घटना उघडकीस आली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास महिलेला उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. बाबत उपजिल्हा रूग्णालयाचा वॉर्डबॉय गणेश बैंडवाल याने दिलेल्या खबरीवरून शिरपूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली़ दरम्यान, विवाहितेने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

