भरधाव चारचाकी उलटली : कन्नडचे तिघे ठार : पाच जण जखमी


शिंदखेडा : भरधाव चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने कार उलटून झालेल्या अपघातात कन्नडचे तिघे तरुण जागीच ठार झाले तर सोबतचे पाच तरुण जखमी झाले. हा अपघात शनिवारीम मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील बाभळे गाव शिवारात झाला. पवन किरण जाधव (24), सचिन सुभाष राठोड (24) व गणेश भगवान हिरे (वय 28) अशी मयतांची नावे आहेत तर सागर समाधान पाटील, नवनाथ आबा बोरसे, शिवाजी जग्गु जाधव, किशोर आसाराम राठोड, गोरख कांबळे हे गंभीर जखमी झाले. जखमींवर धुळ्यातील हिरे शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात
कन्नड परीसरात आठ तरुण चारचाकी (एम.एच.22 यू.7128) ने धुळ्याकडून शिरपूरकडे निघाले असता शनिवारी पहाटे दीड वाजेच्या सुमारास धुळे- शिरपूर रस्त्यावर बाभळे गावाच्या शिवारात जलशुध्दीकरण केंद्राजवळ भरधाव वेगात असलेल्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार उलटल्याचे अपघात झाल्याचे सांगण्यात आले. अपघाताची माहिती कळताच अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, शिरपूर विभागाचे डीवायएसपी माने, शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड, पीएसआय गजानन गोटे, एसएसआय पठाण, सुशीलकुमार गांगुर्डे, विनोद सोनवणे, प्रभाकर सोनवणे, माळी आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. शिंदखेडा पोलिसात उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !