कत्तलीच्या उद्देशाने गुरांची अवैध वाहतूक : 16 गुरांची सुटका


दोघांविरोधात गुन्हा : सात लाख 29 हजारांचा मुद्देमाल जप्त

शिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावर शहर हद्दीतून टोलनाका शिरपूरकडे येणार्‍या एका वाहनातून कत्तलीसाठी अवैधरीत्या 12 गायी व 5 ते 6 दिवसाचे चार वासरे भरुन वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना मिळल्यावरून शहर पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री टोलनाक्यावर कारवाई करीत गुरांची सुटका केली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पथकाने मध्यरात्री टोलनाक्यावर सापळा रचून संशयीत अशोक लेलॅण्ड कंपनीची मालट्रक (पी.बी.13 बी.डी. 5619) या वाहनास थांबवून तापसणी केली असता वाहनात दोन लाख 29 हजार रुपये किंमतीच्या 12 गुरांसह 4/5 दिवसांची चार वासरे मिळून 16 जनावरांचे कत्तलीच्या इराद्याने वाहतूक होत असल्याचे आढळून आले. गायींची सुटका करून देखभाल व संगोपनासाठी वाडी येथील नवकार गो-शाळेत रवाना करण्यात आल्या. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चालक गुरप्रीतसिंग सुकदेवसिंग (23, रा.डोलण, ता.जगराव, जि.लुधियाना (पंजाब) व क्लिनर लखबिरसिंग चमकोरसिंग (24, रा.बजुर्ग, ता.जगराव, जि.लुधियाना, पंजाब) यांच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक गणेश फड, सहा. पोलीस उपनिरीक्षक आर.एन.मोरे, हवालदार यु.एन.पवार, नाईक हेमंत पाटील, कॉन्स्टेबल स्वप्निल बांगर, चालक हारुण शेख यांनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !