जळगावात भाजी विक्रेत्या महिलेचा खून
जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनीतील तुळजामाता नगर परीसरात भाजी विक्रेत्या महिला वंदना गोरख पाटील (42, रा.तुळजामाता नगर, रामेश्वर कॉलनी) यांची हत्या घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. हा खून संशयीत आरोपी सुरेश सुकलाल महाजन (रा.रामेश्वर कॉलनी) याने केल्याचे संशय आहे.
लोखंडी घाव डोक्यात टाकून खून
मयत वंदना गोरख पाटील या रमेश पुंडलिक वंजारी यांच्या घरात 1 जून 2021 पासून भाड्याने राहत होत्या तर त्यांचे पती गोरख पाटील यांचे सुमारे 20 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. वंदना पाटील व संशयीत सुरेश सुकलाल महाजन यांच्यात मार्केटमध्ये ओळख झाल्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाले होते. महाजन हा वंदना पाटील यांना घरखर्च करण्यासाठी पैसे देत होता व पैसे देण्यावरून दोघांमध्ये भांडण होत असल्याने हा खून झाल्याची चर्चा आहे.



सकाळी खुनाची घटना उघडकीस
वंदना पाटील याचा घरात दरवाजा सकाळी 9 वाजेपर्यंत बंद असल्यामुळे शेजारी राहणारा तरूण कुणाल पाटील याला शंका आली. दरवाजा ढकलून बघितले तर वंदना पाटील यांचा खून झाल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांना माहिती कळवण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी घटनास्थळी पाहणी केली.
हे देखील वाचा : जळगावात भाजी विक्रेत्या महिलेचा खून : आरोपी जाळ्यात

