जळगावात भाजी विक्रेत्या महिलेचा खून : आरोपी जाळ्यात


जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनीतील तुळजामाता नगर परीसरात भाजी विक्रेत्या महिला वंदना गोरख पाटील (42, रा.तुळजामाता नगर, रामेश्वर कॉलनी) यांची हत्या झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघड झाली होती. पोलिसांनी तपासचक्रे फिरवत हा खून संशयीत आरोपी सुरेश सुकलाल महाजन (रा.रामेश्वर कॉलनी) याने केल्याचे निष्पन्न केल्यानंतर त्यास शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चोपडा शहराजवळून अटक केली.

हे देखील वाचा : जळगावात 42 वर्षीय महिलेचा खून




लोखंडी घाव डोक्यात टाकून खून
मयत वंदना गोरख पाटील या रमेश पुंडलिक वंजारी यांच्या घरात 1 जून 2021 पासून भाड्याने राहत होत्या तर त्यांचे पती गोरख पाटील यांचे सुमारे 20 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. वंदना पाटील व संशयीत सुरेश सुकलाल महाजन यांच्यात मार्केटमध्ये ओळख झाल्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाले होते. महाजन हा वंदना पाटील यांना घरखर्च करण्यासाठी पैसे देत होता व पैसे देण्यावरून दोघांमध्ये भांडण होत होते. 26 ऑगस्ट रोजी रात्री 10.30 जेवण करून दोघे झोपल्यानंतर मध्यरात्री 3.30 वाजेच्या सुमारास सुरेश महाजन याने पिण्यासाठी पाणी मागितले त्यावर वंदना पाटील यांनी तुमच्याच हाताने पाणी घ्या, तुमचे हात मुडले का ? असे सांगितल्याचा राग आल्याने भाजीपाला विक्री करण्यासाठी लागणारा लोखंडाचा एक किलो डोक्यात टाकला. एका घावात वंदना पाटील बेशुध्द झाल्या. बेशुध्द झाल्याचे पाहून सुरेश महाजन याने पुन्हा-पुन्हा वार करत ठार केले व पहाटे चार वाजेच्या सुमारास चार वाजता दुचाकीने चोपड्याकडे पळ काढला.

सकाळी घटना उघडकीस
वंदना पाटील याचा घरात दरवाजा सकाळी 9 वाजेपर्यंत बंद असल्यामुळे शेजारी राहणारा तरूण कुणाल पाटील याला शंका आली. दरवाजा ढकलून बघितले तर वंदना पाटील यांचा खून झाल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांना माहिती कळवण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलीसांना सुरेश महाजन आणि वंदना पाटील यांच्या संबंधाबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी चक्रे फिरवत संशयीत आरोपी सुरेश महाजन याला चोपडा शहरपासून जवळ असलेल्या एका मंदिरातून अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !