अंतुर्लीतील माय-लेकाचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू


पाचोरा : तालुक्यातील अंतुर्ली येथील माय-लेकाचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. नितीन पंढरीनाथ पाटील (24) प्रतिभा पंढरीनाथ पाटील (45, रा.अंतुर्ली ता.पाचोरा) असे मयतांची नावे आहेत.




विहिरीत तोल गेल्याने मृत्यू
प्रतिभा पंढरीनाथ पाटील यांचे अंतुर्ली शेत शिवारात शेत आहे. गुरुवार, 9 सप्टेंबर रोजी त्यांच्या शेतात फवारणी करण्यासाठी मुलगा नितीन पंढरीनाथ पाटील याच्यासह त्या गेल्या असता फवारणी पंपासाठी पाणी लागणार असल्याने त्या विहिरीतून पाणी काढत असताना त्यांचा तोल गेल्याने त्या विहिरीत पडल्या. आई विहिरीत पडल्याचे पाहून मुलगा नितीन पाटील याने विहिरीकडे धाव घेतली. आईला वाचविण्यासाठी त्याने देखील विहिरीत उडी घेतली. विहिरीत गाळ असल्यामुळे आई व मुलगा यांचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच परीसरातील शेतातील शेतकरी व नागरीकांनी धाव घेतली. तब्बल दोन तासानंतर दोघांचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला. पाचोरा ग्रामीण रूग्णालयात दोघांचे मृतदेह आणण्यात आले. पाचोरा पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

धक्कादायक ! : अहवालात छेडछाडसाठी परमबीर सिंह यांनी सायबर एक्सपर्टला दिली पाच लाखांची लाच 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !