भारत बंदला पाठिंबा : भुसावळात राष्ट्रवादी पदाधिकारी तहसील प्रशासनाला उद्या देणार निवेदन
भुसावळ : भुसावळ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कोरोना सारख्या महामारीमुळे व्यापारी वर्गाच्या आर्थिक स्थितीचा विचार करता भुसावळ शहर बंद न ठेवता सोमवार, 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी तहसील प्रशासनाला निवेदन देणार आहेत.
या मागण्यांसाठी भारत बंदचा इशारा
केंद्र सरकारने केलेले शेतकरी हिताविरोधी कायदे, पेट्रोल, डिझेल, व गॅस दरात सतत होत असलेली दरवाढ, कामगारांना बरबाद करणार्या कायद्या विरोधात, देशातील तरुणांना बेरोजगार करणार्या मोदी सरकारचा तीव्र निषेध, दिल्लीमध्ये मागील 11 महिन्यांपासून आंदोलन करीत असलेल्या शेतकर्यांना पाठिंबा देण्यासाठी भारत बंदचा इशारा देण्यात आला आहे.








