जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त यावलला भव्य रक्तदान शिबिर
यावल (15 मे 2026) : राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राज्याचे संकटमोचक गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.कुंदनदादा फेगडे मित्रपरिवाराच्या वतीने यावलमधील आई हॉस्पिटल, भुसावळ रोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजोपयोगी उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी 35 बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये रक्तदानाचे प्रमाण घटत असल्याने जिल्ह्यासह यावल तालुक्यात रक्ताची कमतरता भासत आहे. अपघातग्रस्त तसेच प्रसूतीच्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उष्णतेमुळे अनेक नागरिक रक्तदान करण्यास पुढे येत नसतानाही समाजहिताचा संदेश देत मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.






या शिबिरात डॉ.कुंदनदादा फेगडे व डॉ.जागृती फेगडे यांनी विशेष सहभाग घेत नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. शिबिरादरम्यान तब्बल 35 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी भूषण फेगडे, राजेश महाजन, निर्मल चोपडे, व्यंकटेश बारी, मनोज बारी, रितेश बारी, उज्वल कानडे, कोमल इंगळे, सागर इंगळे, राहुल झांबरे, चेतन कोळी, गजानन बारी, शुभम देशमुख, नितीन यादव, सनी बडगुजर, सतीश कोळी, अशोक कोळी, मनोज माळी यांच्यासह मोठ्या संख्येने सहकारी मित्रपरिवार उपस्थित होता.
रक्त संकलनाचे कार्य संत जगन्नाथ महाराज अंजाळेकर बहुउद्देशीय संस्था, फैजपूर संचलित संजीवनी ब्लड सेंटर, फैजपूर यांच्या माध्यमातून करण्यात आले.
रक्तदानाच्या माध्यमातून समाजासाठी योगदान देण्याची ही एक सुंदर आणि प्रेरणादायी संधी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


