कर्जाला कंटाळून शेतकर्याची आत्महत्या
महिंदळे, ता.भडगाव : येथून जवळच असलेल्या पळासखेडे रुपनगर येथील दरबार सुभाष वंजारी (50) या शेतकर्याने कर्जास कंटाळून शेतात निंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली. दरबार वंजारी यांच्यावर पाच ते सहा लाख रुपये बँकेचे व दोन ते तीन लाख रुपये खाजगी कर्ज झाल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे. या शेतीसाठीही त्यांनी कर्ज घेतले होते परंतु या वर्षी उत्पन्न येण्याची शक्यता नसल्यामुळे कर्ज कसे फेडावे? या विवंचनेत त्यांनी मंगळवारी मी शेतात जातो, असे पत्नीस सांगितले व शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. संध्याकाळी घरी लवकर न आल्याने त्यांचा शोध घेतला असता ते शेतात निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी शोकाकुल वातावरणात रुपनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा, पत्नी असा परीवार आहे. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हेड कॉस्टेबल कैलास गीते करत आहेत.








