तरुणाईला मोठा दिलासा : नवरात्रोत्सवात गरबा खेळण्यास परवानगी


मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे नागरीकांना कुठलेही सण-उत्सव नियमांना अधीन राहून साजरा करता आले मात्र राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने आगामी नवरात्रोत्सवात भाविकांना दांडिया रास (गरबा) खेळण्यास परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भात राज्य सरकारने मुंबईबाहेर या अटींमध्ये शिथिलता आणली आहे. मात्र, कोरोना नियमांची काटेकोरपणे पालन करूनच गरबा खेळता येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

राज्यात दांडिया रासला परवानगी
मुंबई वगळता राज्यभरात गरबा खेळण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्रालयाची मान्यता आहे. सभागृहात गरबा खेळताना त्याच्या क्षमतेपेक्षा 50 टक्केच लोक असतील याची दक्षता घ्यावी लागेल. याबरोबरच कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे टोपे यांनी सांगितले. मुंबईत गरबा मोठ्या प्रमाणात खेळला जातो, तसेच त्याला व्यावसायिक स्वरुप मोठे आहे. मुंबईत गरब्यावर निर्बंध असल्याने मुंबईकरांची मोठी निराशा झाली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !