जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडून रावेर पुरवठा निरीक्षकांची झपाई


दिव्यांग बांधवांना सन्मानाने वागणूक देण्याच्या सूचना

रावेर : दिव्यांग बांधवांच्या प्रकरणावरुन रावेर पुरवठा निरीक्षक अतुल नागरगोजेंची जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी चांगलीच झपाई केली. कार्यालयात येणार्‍या प्रत्येक दिव्यांग बांधवांना सन्मानाने वागणूक देवून त्यांच्या समस्या सोडविण्याचे आदेश दिले असल्याचे जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सांगितले. रावेर पुरवठा निरीक्षक अतुल नागरगोजे यांच्याकडून दिव्यांग बांधवांना नेहमी अपमास्पद वागणूक देऊन फिरवले जात असल्याने त्यांच्या कुलूप बंद कार्यालयाला हार टाकून गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करण्यात आले होते. रावेर पुरवठा निरीक्षक दिव्यांग बांधवांची फिरवा-फिरव करतात त्यांना रेशन कार्ड देण्यासाठी अडवणूक करतात त्यामुळे तालुकाभरातील दिव्यांग बांधवांची भटकंती होत होती. या प्रकरणाची दखल खुद्द जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी घेतली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !