कोस्टल रोड कामात 1600 कोटींचा भ्रष्टाचार : भाजपा नेते आशीष शेलार यांचा आरोप


मुंबई : भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन कोस्टलरोड मधील भ्रष्टाचार उघड केला. यापुर्वी त्यांनी 6 सप्टेंबरला पत्रकार परीषद घेऊन कोस्टल रोडच्या कामात 1 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा अरोप केला होता. त्याला तातडीने त्याच दिवशी मुंबई महापालिकेने खुलासा करून उत्तर दिले होते. या खुलाशामध्ये महापालिकेने, या कामात कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार व अनियमितता न झाल्याचा दावा केला होता. त्यावर आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आशिष शेलार यांनी पुराव्यासहित या कामात कसा भ्रष्टाचार होतोय हे उघड केले. मुंबईकरांसाठी महत्वाच्या असणा-या कोष्टल रोडच्या कामात 1600 कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग आताचा दिसू लागला आहे. या प्रकरणी तातडीने कंन्टल्टनला काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि या अपहाराची व लुटमारीची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावे, अशी मागणी शेलार यांनी केली.

प्रकल्पाला विरोध नाही, त्यातील भ्रष्टाचाराला विरोध
याबाबत बोलताना ते म्हणाले की, कोस्टल रोड हा भाजपाचा ड्रिम प्रकल्प असून मुंबईला त्याची गरज आहे. म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या परवानग्या तातडीने मिळवून दिल्या. त्यानंतर मात्र ज्या पध्दतीने काम सुरू आहे त्यावरून कामाचा दर्जा निष्कृष्ट दर्जा आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्यच धोक्यात आले आहे. या प्रकल्पाला भाजपाचा विरोध नसून यातील भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे असं शेलार यांनी यावेळी स्पष्ट केलंय. प्रकल्पाचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असून प्रकल्पासाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. या प्रकल्पातील प्रियदर्शनी पार्क ते बरोडा पॅलेस या पॅकेज 1 या कामाबाबत डिसेंबर 2019 ते 2020 या कालावधीत एका वर्षातील भ्रष्टाचार आणि अपव्यवहाराचे पुरावे शेलार यांनी सादर केले. या प्रकल्पाला कायदेशीर पध्दतीने काम करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने दोन कंन्सल्टंट नियुक्ती केली असून ए.ई. काँम या कंपनीची जनरल कन्सल्टंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लुईस बर्गर यांना प्रकल्प कंन्सल्टंट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी या दोन कंपन्यानाला 600 कोटी रुपये देण्याचे स्थायी समितीने मंजूर केले आहे. महापालिकेला या दोघांनी सल्लामसलत करून काम योग्य दिशेने होईल, तसेच ठेकेदाराकडून योग्य दर्जाचे काम होईल यासाठी या दोन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या दोन कंन्स्टल्टने कुठल्या दर्जाचा माल भरावासाठी घेण्यात यावा, तसेच कुठल्या खाणीतून हा माल घेण्यात यावा या प्रमाणीत खाणीच्या याद्या देण्यात आल्या. मालाची घनताही ठरवण्यात आली. प्रत्यक्षात मात्र कंन्सल्टटने ठरवून दिलेल्या खाणीतील माल न घेता तो अन्य खाणीतून निकृष्ठ दर्जाचा माल घेण्यात आला त्यामुळे या प्रकल्पाच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे व प्रकल्पाला धोका निर्माण झाला आहे.







 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !