भुसावळात सेवानिवृत्त कर्मचार्यांसाठी 15 डिसेंबर रोजी पेन्शन अदालत
भुसावळ : सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या तक्रारी कमी करण्यासाठी बुधवार, 15 डिसेंबर रोजी भुसावळातील डीआरएम कार्यालयात पेन्शन अदालतीचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. पेन्शनर धारकांनी मोबाईलवर संपर्क साधावा तसेच पेन्शन धारकांच्या तक्रारींचे शासनाच्या वर्तमान दिशानीर्देशानुसार तत्परतेने निराकरण केले जाईल तसेच पेन्शन अदालतीत केवळ पेन्शनशी संबंधित बाबींवर विचार जाणार आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांनी आपल्या तक्रारींचे अर्ज वरीष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी, भुसावळ यांना ऑनलाइन गूगल फॉर्म वर दिलेल्या लिंकवर क्लिक करून सादर करावे. अर्जात आपले नाव, पदनाम, भरती तारीख, आपल्या तक्रारीचे स्वरुप इत्यादी नमुद करावे, व अर्जासोबत पास बुकची झेरॉक्स, पीपीओची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स पीडीएफ फाईल स्वरूपात ई मेल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज जमा करण्याची अंतीम तारीख रविवार, 31 ऑक्टोबर आहे.
