भुसावळ विभागात विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्पाने स्वागत
कोरोनाच्या भीतीने शहरासह ग्रामीणमध्ये अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची पाठ : पंधरवड्यात शाळा होणार पूर्ववत
भुसावळ : शहरासह विभागात सोमवार, 4 ऑक्टोबरपासून शहरी भागात इयत्ता आठवी ते बारावी तर ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीच्या 203 शाळांना सोमवार, ऑक्टोबरपासून सुरूवात झाली. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे याप्रसंगी गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आले. शाळा प्रशासनाने यापूर्वीच शाळांच्या इमारतीसह व वर्ग निर्जंतूक केले होते तर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सॅनिटायजर व हॅण्डवॉशची सुविधा देण्यात आली. दरम्यान, शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन आठवड्यांमध्ये विद्यार्थ्यांवर थेट शिक्षणाचा भार न टाकला जाणारनसून विद्यार्थ्यांना शाळेची सवय होण्यासाठी दोन आठवडे प्रयत्न केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरी व ग्रामीण भागात उपस्थिती घटली
भुसावळ शहर व विभागात सोमवारी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत घट झाल्याचे दिसून आले. ग्रामीण भागातील शाळेत पाचवी ते बारावीसाठी 15 हजार 357 पैकी चार हजार 526 विद्यार्थ्यांनी तर शहरी भागात आठवी ते बारावीच्या 16 हजार 88 पैकी दोन हजार 808 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.



अहिल्यादेवी कन्या विद्यालयात विद्यार्थिनींचे पुष्प देऊन स्वागत
भुसावळ शहरातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात सोमवारी आठवी ते दहावीच्या वर्गात आलेल्या विद्यार्थिनींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ची शाळा सुरु करण्यात आली. दीड वर्षाच्या कालावधी नंतर शाळा सुरु झाल्याने विद्यार्थिनींचे मा.मुख्याध्यापिका व पर्यवेक्षक संजीव पाटील यांनी विद्यार्थिनींना पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. पी.पी.जोशी यांनी कोविड नियमांची माहिती दिली. एका बेंचवर एक विद्यार्थीनीची बसण्याची व्यवस्था करण्यात आली.
