अट्रावल येथे एकाची गळफास घेत आत्महत्या


यावल : तालुक्यातील अट्रावल येथील शेत मजूराने शेतात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भानुदास नीळकंठ चौधरी (45) असे मयताचे नाव आहे. यावल तालुक्यातील अट्रावल शेतमजुर भानुदास नीळकंठ चौधरी (45) हे सोमवारी दुपारी 4 वाजता शेतात गेले असता त्यांनी रात्री 9.30 वाजेच्या पुर्वी आपल्या अट्रावल शिवारातील कालिदास नीळकंठ चौधरी यांच्या शेताच्या बांधावरील असलेल्या निंबाच्या झाडावर दोरी बांधुन त्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. शेतकरी कालिदास चौधरी यांच्या खबरीनुसार यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस अमलदार अशोक जवरे हे करीत आहे . मयत भानुदास चौधरी यांने आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ट होवू शकले नाही. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.शुभम तिडके यांनी मयत भानुदास चौधरी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !