भुसावळातील शहिद भगतसिंग फाऊंडेशनतर्फे श्रीराज वाणीचा सन्मान


भुसावळ : नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससी परीक्षेत भुसावळ येथील पंढरीनाथ नगर परिसरातील, महाराणा प्रताप विद्यालयाचा माजी विद्यार्थी श्रीराज मधुकर वाणी याने 430 वी रँक मिळवून घवघवीत यश मिळवल्याने त्याचा शहीद भगतसिंग फाऊंडेशनतर्फे ‘आई मी कलेक्टऱ व्हयनू’ हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर होणार
भुसावळ परीसरातील विद्यार्थ्यांना शासकीय सेवेची नवी दिशा श्रीराज वाणी यांनी दाखवली. अथक परीश्रम आणि योग्य नियोजन केल्यास अशक्य असे काहीच नाही. भविष्यात शहीद भगतसिंग फाऊंडेशनतर्फे स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन शिबिर घेण्यात येईल जेणेकरून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची माहिती र्होइल आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळेल, असे प्रतिपादन शहीद भगतसिंग फाऊंडेशचे अध्यक्ष निलेश रायपूरे यांनी केले. दरम्यान, सत्कारप्रसंगी भगतसिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश रायपुरे, ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव हायस्कूलचे शिक्षक आर.डी.तायडे, डी.पी.तायडे, मधुकर वाणी, सुनंदा वाणी व राजेश कुळकर्णी हे उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !