फैजपूर पोलीस दलात नवीन चारचाकी वाहन दाखल


फैजपूर : फैजपूर शहरात पोलीस गस्त वेळेवर व्हावी तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्‍नानंतर तातडीने पोलीस कुमक पोहोचता यावी या उद्देशाने नवीन चारचाकी पोलीस दलात नुकतीच दाखल झाली. या वाहनाची पूजा सहा.निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांनी केली. शहरासह परीसरात कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी पोलिसांना जलद गतीने गुन्ह्याचा तपास लागावा यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून फैजपूर पोलीस स्टेशनला नवीन वाहन प्राप्त झाले.

28 गावांमध्ये गस्त होणार
फैजपूर पोलीस स्टेशनला एकूण 28 गावे लागून आहेत. यात काही गावे मोठे असून जुने वाहन बर्‍याच वर्षा पासून असल्याने वारंवार दुरुस्तीला खर्च लागत होता. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ..प्रवीण मुंढे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पोलीस स्टेशनला नवीन वाहनांची मागणी केली होती. दरम्यान, फैजपूर पोलीस स्टेशनला गेल्या महिन्यातच रुजू झालो होतो. त्यातच माझ्या कारकिर्दीत नवीन वाहन मिळाले याचा आनंद आहेच पण या वाहनामुळे रात्रीची गस्त सुलभ होणार आहे. कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेव्यासाठी या वाहनाची मदत होणार आहे. फैजपूर शहर हे भौतीकदृष्टया महत्वाचे असल्याचे सहा.निरीक्षक सिध्देश्वर आखेगावकर म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !