शिरपूरला 17 वर्षीय तरुणाची आत्महत्या : कारण अस्पष्ट


शिरपूर : आई-वडील दवाखान्यात औषधोपचारासाठी गेलेले असताना 17 वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना सोमवारी दुपारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शिरपूर शहरातील पद्मावती नगर मधील श्री साई मित्र अपार्टमेंटमध्ये उघडकीस आली. प्रतीक्षा अरुण बेलदार (17) असे मयताचे नाव आहे. शहरातील मुकेश भाई क्रिएशन गार्डन मागील पद्मावती नगरातील श्री साई मित्र अपार्टमेंट प्रतीक्षा आपल्या आई-वडिलांसह वास्तव्यास होती. सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास अरुण बेलदार हे पत्नीसह दवाखान्यात औषध उपचारासाठी गेले असताना त्यांची 17 वर्षे मुलगी प्रतिक्षा ही घरीच होती. दरम्यान दुपारी दोन वाजेच्या सुमारास दवाखान्यातून परत आल्यावर घरात मुलीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे उघडकीस आले. मृतदेह खाली उतरवून आतेभाऊ नितेश सुभास कुमावत याने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. डॉ.शशिकांत पाटील यांनी तपासणी करून मृत घोषित केले. याप्रकरणी वार्डबॉय नितेश गवळी यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण मालचे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !