लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ 11 रोजी महाराष्ट्र बंद ; जयंत पाटील यांची माहिती
मुंबई : राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची आघाडी असलेल्या महाविकास आघाडीने 11 ऑक्टोबरला लखीमपूर खेरी प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, असे राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. हा बंद पक्षांच्या वतीने असून राज्य सरकारच्या वतीने नाहीय असे देखील पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षासोबत देखील आम्ही बोलणार आहोत असे देखील ते म्हणाले.
भाजपाच्या भूमिकेकडे लागले लक्ष
महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिल्याने आता भाजपा त्याला काय प्रत्यूत्तर देते, यावरून बंद यशस्वी होणार की चिघळणार हे ठरणार आहे. यूपीतील योगी सरकारने राजकीय नेत्यांना लखीमपूरला जाण्याची परवानगी दिली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशिवाय आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनाही लखीमपूरला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर योगी सरकारने मृत शेतकर्यांच्या वारसांना 45 लाख रुपये आणि सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे.




'Maha Vikas Aghadi' (NCP-Congress-Shiv Sena alliance) calls for a statewide bandh on October 11 against the Lakhimpur Kheri violence incident: Maharashtra Minister and NCP leader Jayant Patil
(File pic) pic.twitter.com/e1RGziNHem
— ANI (@ANI) October 6, 2021