जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांची सोशल मिडीयात बदनामी : जळगावातील फेसबुक धारकाविरोधात गुन्हा


Defamation of Water Resources Minister Girish Mahajan on social media: Case registered against a Facebook user from Jalgaon जळगाव (19 जून 2026) : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची सोशल मिडीयात एआय फोटोद्वारे बदनामी करून आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत करणार्‍या जळगावच्या फेसबुकधारकाविरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?
जळगावचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी सायबर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, राज्याचे संकटमोचक तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचे फोटो एका तरुणीसोबत एआय तंत्रज्ञानाद्वारे (मॉर्फ) करून त्यासोबत आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावरील फेसबुक प्लॅटफार्मवर प्रसारित करण्यात आला. या प्रकरणी भरत बालाजी म्हस्के (जळगाव) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.




मंत्र्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न
दाखल तक्रारीनुसार, मंत्री महाजन यांची राजकीय व सामाजिक प्रतिष्ठा मलीन करण्यासाठी मंत्री महाजन यांचे एका महिलेसोबत एआयद्वारे फोटो प्रसारीत करण्यात आले. खातेधारकाने आपली ओळख लपवण्यासाठी बनावट नावाने खाते बनवले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, सायबर पोलिसांनी या गुन्ह्याच्या अनुषंगाने आता तपासाला सुरूवात केली आहे. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !