अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असल्यास जनतेने विचार करावा : अजित पवार
मुंबई : आयकर विभागाने कुणावर छापेमारी करावी हा त्यांचा अधिकार आहे. माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. मी नियमित टॅक्स भरतो, अर्थमंत्री असल्याने आर्थिक शिस्त कशी लावायची, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, टॅक्स कसा भरायचा असतो हे मला चांगलं माहिती आहे, माझ्या कंपन्यांचा टॅक्स वेळच्या वेळेला भरला जातो, तरीही राजकीय हेतूने ही धाड टाकण्यात आली की काय माहिती हवी होती हे इन्कम टॅक्सलाच माहिती मात्र माझ्या तीन बहिणींच्या निवासस्थानी आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. मी पण एक नागरिक आहे. मला एका गोष्टीचं दुख आहे, ज्यांची 35-40 वर्षापूर्वी लग्न झाली, त्यांचा चांगल्या पद्धतीने संसार सुरु आहे. त्या तीन बहिणींवर, कोल्हापूरच्या आणि पुण्यातील दोन बहिणींकडे धाडी टाकण्यात आल्या, त्याचं कारण मला माहिती नाही. त्या व्यवस्थित आपलं जीवन जगत आहेत. त्यांच्या मुलांची-मुलींची लग्न झाली आहेत, नातवंडं आहेत. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने याचा जरुर विचार करावा, कोणत्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो, हे पाहाव, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
खतरनाक लव्हस्टोरी ! : सात मुलांची आई प्रियकरासोबत रफूचक्कर



