भुसावळातील आठवडे बाजारात अस्वच्छता : प्रहारचे आंदोलन
भुसावळ : भुसावळातील बाजारात स्वच्छता केली जात नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून कचरा पडून असल्याच्या निषेधार्थ विक्रेत्यांनी पालिकेविरोधात शुक्रवारी सकाळी घोषणाबाजी करीत पालिकेच्या कामकाजाचा निषेध केला. तातडीने स्वच्छता करण्यात न आल्यास प्रहार जनशक्ती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दीपक काटकर यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.. यावेळी पालिका प्रशासनाच्या विरूध्द भाजीपाला व्यापार्यांनी घोषणाबाजी केली.
यांचा आंदोलनात सहभाग
शुक्रवारी सकाळी सात वाजता भाजीपाला व्यापारी व विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले. यावेळी प्रहार जनशक्ती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिपक काटकर, उपाध्यक्ष योगेश चौधरी, अनिल दत्तू चौधरी, राहूल दिपके, देवेद्र चौधरी, उमेश चौधरी, विजय बाविस्कर, प्रमोद माळी आदी आंदोलनात सहभागी झाले.



