रावेर कृउबात प्रशासक पदासाठी 9 नावांची शिफारस


आमदार शिरीष चौधरी यांचा पाठपुरावा : राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसच्या प्रत्येकी तीन सदस्यांना संधी मिळणार !

रावेर : रावेर कृषी उपन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला मिळालेली मुदत येत्या 23 ऑक्टोबर रोजी संपत आहे. आमदार शिरीष चौधरी यांनी भाजपा सोडून राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या प्रत्येकी तीन अशा एकूण नऊ संचालकांना प्रशासक मंडळ म्हणून नियुक्ती देण्याची शिफारस पालकमंत्र्याकडे केल्याने त्यामुळे विद्यमान सभापती गोपाळ नेमाडेंसह भाजपा संचालकांचा येथून पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केळी भावाचा गुंता सुटलाच नाही
माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे व माजी आमदार अरुण पाटील यांच्या पुढाकारामुळे रावेर कृषी उपन्न बाजार समितीत 2016 मध्ये सर्वपक्षीय पॅनल निवडुन आले. त्यानंतर सर्व संचालक मंडळाने आपसात ठरवून भाजपा काँग्रेस व राष्ट्रवादीने येथे सभापती-उपसभापती पदे भूषवली परंतु भाजपाला दे-धक्का देत आमदार शिरीष चौधरी यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेस पक्षाची प्रत्येकी तीन नावे प्रशासक मंडळासाठी निश्चित केल्याने सभापती गोपाळ नेमाडेसह भाजप सदस्यांचे येथून पत्ते कट होणार आहेत. दरम्यान, केळी भावाचा गुंता-गुंतीचा जटील प्रश्न विद्यमान संचालकांना सोडविता आलेला नाही.




आघाडीच्या फॉर्म्युला नुसार शिफारस ः आमदार चौधरी
रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीला महाविकास आघाडीच्या फॉर्म्युला नुसार प्रशासक मंडळ नियुक्ती देण्याचे आम्ही ठरविले आहे. यासाठी आम्ही काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी तिन्ही पक्षाच्या प्रत्येकी तीन अशा एकूण नऊ संचालकांचे प्रशासक मंडळ देण्याचे ठरविले आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले.

लवकरच बाजार समितीची रणधुमाळी
रावेर बाजार समितीची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी येत्या तीन महिन्यात केव्हाही होण्याची शक्यता आहे. बाजार समितीने पाच वर्षात सात सभापती पाहिले. यापैकी राष्ट्रवादीचे अध्यक्ष नीळकंठ चौधरींचा कार्यकाळात मागील दहा वर्षात सर्वाधिक 41 लाखांचा वाढावा बाजार समितीला मिळवून दिला तसेच टन काटे, शॉपींग कॉम्प्लेस लेआऊट, शेतकरकरी व्यापारी संदर्भात तक्रारी चौधरी यांनी निर्णय घेऊन सोडवल्या.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !