भुसावळ शहरात तलाठी बांधवांची निदर्शने
भुसावळ : भुसावळ तालुका तलाठी संघातर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी भुसावळ त्हसीलदार दीपक धीवरे यांना पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची तातडीने बदली करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. अर्वाच्य भाषेत संबोधन करणार्या जगताप यांना पायउतार करावे, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र फेरफार प्रकल्प राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष दुबल आप्पा यांना मुर्ख असे संबोधन केल्याने राज्य तलाठी संघाच्या सदस्यांचे मन दुखावले आहे. यावर निर्णय न झाल्यास तहसीलदार यांच्याकडे डी.एस.सी.जमा करून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. नैसर्गिक आपत्ती कामे व निवडणुकीची कामे वगळता बुधवार पासून सर्व कामे बंद करण्यात येतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यांचा आंदोलनात सहभाग
भुसावळ तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष व्ही.आर.बारी, उपाध्यक्ष के.आर.ठाकूर, सचिव पवन नवगाळे, जिल्हा संघटक एस.एम.इंगळे, कार्याध्यक्ष के.डी.गोरोले, सहचिटणीस डी.एम.पवार, खजिनदार अंजुषा जाधव, सल्लागर एस.जे.इंगळे, एस.व्ही.कुंभार, बाळासाहेब गायकवाड, मनीषा गायकवाड, हिना शेख, साधना खुळे, वाघमारे, माधुरी सोनवणे, वैशाली पाटील, जयश्री पाटील व तलाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



