चाळीसगाव शहरात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद


चाळीसगाव : महाराष्ट्र बंदला चाळीसगावात संमिश्र प्रतिसाद लाभला. महाविकास आघाडीच्या पदाधिका-यांनी शांततेच्या मार्गाने व्यापा-यांसह दुकानदारांना बंदचे आवाहन केले. पोलिसांनी चोख बंदोबस्त राखला. बसेसच्या फेर्‍या नियमितपणे सुरु असल्या तरी बस स्थानकात प्रवाश्यांची फारशी गर्दी दिसून आली नाही. पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी बंदचे आवाहन केल्यानंतर काही प्रमाणात दुकाने बंद झाली.

व्यापार्‍यांना केले बंदचे आवाहन
सोमवारी दुपारी जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, पं.स.चे सभापती अजय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, किसनराव जोर्वेकर, शाम देशमुख, भगवान पाटील, मोहित भोसले, शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश चव्हाण, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, दिलीप घोरपडे, भीमराव खलाणे, सुनील गायकवाड, वशिम शेख, सविता कुमावत, प्रतिभा पवार, शैलेंद्र सातपुते, संजय ठाकरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल निकम, शहराध्यक्ष देवेंद्र पाटील, माजी आमदार ईश्वर जाधव, ए.व्ही.पाटील, रवींद्र जाधव, शहर महिला अध्यक्षा अर्चना पोळ, सेवा दलाचे तालुकाध्यक्ष, आर. डी. चौधरी, पंकज शिरोडे आदि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी बंदचे आवाहन करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. पोलिस निरीक्षक के.के.पाटील व सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त राखला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !