व्यापारी संघटनेतर्फे कुर्‍हा कडकडीत बंद


कुर्‍हाकाकोडा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्यानंतर कुर्‍हाकाकोडा व्यापारी संघटनेने बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला. कुर्‍हा व्यापारी संघटनेतर्फे सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली. काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय पाटील, राष्ट्रवादी कुर्‍हा शहराध्यक्ष, गजानन पाटील, शिवसेना शहर प्रमुख, राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस रवींद्र दांडगे, पंकज पांडव, राजू शर्मा, सतीश नागरे, नितीन कासार, अविनाश वाढे, पंकज धाबे, ज्ञानेश्वर तायडे, दिलीप आंबेकर, मयूर साठे, सुशील भुते, रमेश खंडेलवाल, आसीफ ठेकेदार, हरवून भाई, अफू भाई व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !