महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळ अध्यक्षपदी चंद्रकांत चौधरी यांची बिनविरोध निवड
भुसावळ : महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी यांची सर्वानुमाते बिनविरोध निवड करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या लोकसेवकांच्या निवडणुकीत ही निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी मोहन खैरकर यांच्या शिस्तबद्ध निवडणूक कार्यक्रमात महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यातून किमान 160 पेक्षा अधिक सर्वोदय पदाधिकारी, लोकसेवक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया राबवण्यात आली. निवडीनंतर चंद्रकांत चौधरी व त्यांच्या पत्नी सीमा चंद्रकांत चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन महेंद्र पाटील (जळगाव) यांनी केले. प्रवीण राऊत, नितेश पाटील, बाबा खैरकर, कविवर्य शाम खेडकर, शेतकरी पुढारी दामू पंत उघडे, डॉ.प्रमोद टाले आदींनी सहकार्य केले. आभार अविनाश सोमनाथ यांनी मानले. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भ्रमंती करून पुढील नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल, असे नूतन अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी सांगितले.
