थेरोळा शिवारात पट्टेदार वाघाच्या संचारामुळे नागरीकांमध्ये दहशत


रावेर : तालुक्यातील थेरोळा शेती-शिवारात पट्टेदार वाघाच्या संचार सुरू असल्याने नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. याची माहिती नागरीकांनी वनविभागाला दिली आहे. दोन दिवसांपूर्वी याच परीसरात बिबट्याने गाय फस्त केल्याची घटना ताजी असताना पशूपालकांमध्ये भीती पसरली असताना पट्टेदार वाघाच्या वावराने भीती अधिकच वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी थेरोळा परीसरात बिबट्याने एका गायीला फस्त केल्याची घटना घडल्यानंतर मंगळवारी पुन्हा काही शेतांमध्ये मोठे पगमार्ग मिळाले आहे. पगमार्ग बघून संचार करणारा प्राणी पट्टेदार वाघ असल्याची शक्यता वर्तवली जता आहे. वाघाची दोन पिल्ले अससून त्याबाबतचे पगमार्ग नागरीकांना दिसल्याने याबाबतची माहिती नागरीकांनी वनविभागाला दिली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !