लोंढे येथे सेवा सहयोग फाउंडेशन व गुणवंत दादा सोनवणे यांच्या माध्यमातून स्कुल किटचे वाटप


चाळीसगाव : तालुक्यातील लोंढे येथील जिल्हा परीषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना स्कुल किट वाटप कार्यक्रम नुकताच झाला. सेवा सहयोग संस्थेतर्फे शालेय साहित्य असलेल्या स्कूल किटचे नुकतेच वाटप करण्यात आले. याप्रसंगी हिरामण सोनवणे, प्रवीण राठोड, रवींद्र देवरे, साहेबराव निकम, जयाजी भोसले, प्रमोद निकम, राजू पवार, सुरेश पगारे, वामन केदार, सतीश बागुल, रामचंद्र बागुल आणि सर्व पालक-शिक्षक यांच्या हस्ते विद्यार्थी-विद्यार्थिनींना दप्तरासह कंपासपेटी, स्केचपेन, वह्यांसह शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शालेय किट मिळाल्याने विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !