भुसावळात 78 थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा कट
सहा कोटी थकबाकीच्या वसुलीसाठी धडक मोहिम : एका दिवसात दहा लाखांची वीज बिल वसुली
भुसावळ : वीज महावितरण कंपनीची थकबाकी न भरणार्या शहरातील शिवाजी नगर भागातील तब्बल 78 वीज ग्राहकांचा मंगळवारी वीज कंपनीने कट केल्याने थकबाकीदारांच्या गोटात खळबळ उडाली तर 112 वीज ग्राहकांकडून सुमारे दहा लाख रुपयांच्या वीज बिलांची वसुली करण्यात आली. शहरात महावितरणचे ग्राहकांकडे तब्बल सहा कोटी रुपये वीज बिल थकल्याने वीज कंपनीने थकबाकीदारांविरोधात धडक मोहिम सुरू केली आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई
शहरातील शिवाजी नगर विभागात महावितरण जळगावचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, अधीक्षक अभियंता फारुख शेख, अधीक्षक अभियंता मानकर, भुसावळचे कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता गोपाळ महाजन यांच्यासह 62 अधिकारी, कर्मचारी, लाईनमन यांच्या उपस्थितीत साडेचार लाख रुपये थकबाकी असलेल्या 78 जणांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात तोडण्यात आला तर 112 ग्राहकांकडून 10 लाख रुपयांची थकीत वसूली करण्यात आली.



