वढोदा गाव समस्यामुक्त होणार !
आमदार चंद्रकांत पाटील : मूलभूत समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याही ग्वाही
कुर्हाकाकोडा : जवळच असलेल्या वढोदा येथे ‘आमदार आपल्या दारी कार्यक्रम’ नुकताच झाला. यावेळी रस्त्यांसह गटारी व पाणीप्रश्नाबाबत ग्रामस्थांनी व्यथा मांडल्या. याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांनी वढोदा गावातील समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे सांगत रस्ता कामांसाठी निधी देण्याचे आश्वासन प्रसंगी दिले. कुर्हा परीसरातील शिवसेना व युवासेना यांच्या वतीने वढोदा गावात ‘आमदार आपल्या दारी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
ग्रामस्थांनी मांडल्या विविध समस्या
गेल्या 30 वर्षांपासून गावाचा विकास झालेला नाही, गावात चालायला धड रस्ते नाहीत, गटारी नसल्याने सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे, पिण्याचे पाणी तसेच विजेसह अन्य समस्या सुटल्या नसल्याने या समस्या सोडवण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी यावेळी आमदारांकडे व्यक्त केली.



वढोद्यातील मूलभूत समस्या सोडवणार : आमदार
आमदार चंद्रकांत पाटील यांनी घरकुला संदर्भात 350 ते 400 नागरीकांचे 1500 स्केअर फूट जागा 2011 या वर्षीच्या अगोदरच्या भोगवटा, गायरान जमीन महसूल विभागाच्या जमीन तहसीलदार व गटविकास अधिकारी यांची बैठक घेवून या जमिनी चतुःसीमेसहीत ग्रामस्थांच्या नावे करण्याची ग्वाही दिली. जमीन मोजणीसाठी लागणारे पैसे ग्रामपंचायतीकडे नसल्याने डीपीडीसीतून हा खर्च करावा या बाबत पालकमंत्र्यांची चर्चा करू, असे सांगून आमदार म्हणाले की, महिनाभराच्या आत वढोदा गावासाठी स्वतंत्र ग्रामविकास अधिकारी नियुक्ती करण्यात येईल, गावातील गटारींसह रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी एक कोटींचा निधी देण्यात येईल व मूलभूत समस्या सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले.
यांची होती उपस्थिती
यावेळी तहसीलदार श्वेता संचेती, तालुका वैद्यकीय अधिकारी अमित घडेकर, कुर्हा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.तोडसम, वीज कंपनी अभियंता नीळकंठ राठोड, तलाठी संतोष गायकवाड, ग्रामपंचायत सरपंच स्वप्ना खिरोडकर, ग्रामविकास अधिकारी जयपाल चिंचोरे, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, शिवसेना उपतालुकाप्रमुख नवनीत पाटील, शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, स्वीय सहायक प्रशांत पाटील, स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, शुभम शर्मा, दीपक पवार, शिवसेना सोशल मिडीया तालुकाप्रमुख दीपक वाघ, कुर्हा शिवसेना शहरप्रमुख पंकज पांडव, बाळासाहेब पाटील, उप जिल्हा प्रमुख सतीश नागरे, कुर्हा युवा सेना शहर प्रमुख अविनाश वाढे, नारायण पाटील, नितीन कासार, पंकज धाबे, राहुल खिराळकर, रीतेश मुळंतकर, जयेश वाघ, शैलेश पाटील, विश्वास पाटील, प्रमोद वाघमारे, दयाराम पाटील, रशीद मेंबर, युनूस हाजी, सोहेब खान, वसंत लहासे, गजानन इंगळे, शेख निसार, गजानन इंगळे, अविनाश हटकार, किसना झिटे, सिद्धार्थ लहासे, गजानन खिरोळकर, इम्रान हाजी, राजू जाधव, वढोदा येथील महिला व ग्रामस्थ सहभागी झाले.
