36 वर्षीय तरुणाचा रेल्वे धक्क्याने मृत्यू


धरणगाव : तालुक्यातील चावलखेडा येथे रेल्वे रूळावर 36 वर्षीय तरूणाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. धरणगाव ते चावलखेडा स्टेशन दरम्यान 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास एका 36 वर्षीय व्यक्तीचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू झाला. याबाबत चावलखेडा स्टेशन मास्टर यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात याची माहिती कळविली. माहिती मिळताच धरणगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष थोरात हे घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान मयताच्या खिश्यात मतदान कार्ड सापडल्याने सुभाषभाई दुराभाई गऊड (36, रा.पटेल नगर उधना, गुजरात) असे असल्याचे समजले. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास खुशाल पाटील करीत आहे.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !