भुसावळात उद्या राष्ट्रीय दलित पँथरतर्फे रेल रोको आंदोलन
भुसावळ : अप पुष्पक एक्स्प्रेसमध्ये भर दिवसा महिलेवर झालेल्या अत्याचार रेल्वे गाडीतील ड्युटीवरील अधिकारी व कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करावी, लखीमपूर घटनेतील दोषींवर कारवाई करावी, भुसावळ रेल्वे हद्दीतील अतिक्रमण काढण्यात आल्यानंतर विस्थापीतांचे अद्यापपर्यंत पुर्नवसन करण्यात आले नसल्याने संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी तसेच प्रत्येक कुटुंबाला सरकारने पाच लाखांची भरपाई द्यावी, बसस्थानक रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी यासह अन्य मागण्यांसाठी राष्ट्रीय दलित पँथरतर्फे शनिवार, 23 रोजी दुपारी दोन वाजता रेल्वे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाबाबत रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनावर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सोनवणे, जिल्हाध्यक्ष सुदाम सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष वैशाली हिरोळे, युवा जिल्हाध्यक्ष राजू तायडे, जिल्हा उपाध्यक्ष अल्केश मोरे, तालुका उपाध्यक्ष अल्केश मोरे, तालुका उपाध्यक्ष शांताराम नरवाडे, तालुकाध्यक्ष सुनील रायमळे, जिल्हा कार्याध्यक्ष छोटेलाल हरणे, भीमराव वाघ आदींची नावे आहेत.
