लेवा विकास महासंघाच्या युवक जिल्हा उपाध्यक्षपदी प्रा.धीरज पाटील


भुसावळ : तालुक्यातील युवा कार्यकर्ते प्रा.धीरज पाटील यांची अखिल भारतीय लेवा विकास महासंघाच्या युवक जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. अखिल भारतीय लेवा विकास महासंघ संस्थापक केंद्रीय अध्यक्ष विष्णू भंगाळे, युवक जिल्हाध्यक्ष राजेश वारके यांनी निवडीचे पत्र दिले. डॉ.स्नेहल फेगडे, अखिल भारतीय लेवा विकास महासंघाचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष गौरव भोळे, युवक शहराध्यक्ष स्वप्निल रडे, युवराज पाटील, तेजस भंगाळे उपस्थित होते.

तरुणांना योग्य दिशा दाखवणार असल्याचा विश्वास
प्रा.धीरज पाटील हे भुसावळ परीसरातील एक अभ्यासू, आक्रमक, आणि विश्वासू युवा नेतृत्व म्हणून प्रचलित आहेत. राजकारण आणि समाजकारणात ते सक्रिय असून शेतकरी, युवक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक आणि महिला यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. समाजातील अनेक तरुणांना ते योग्य दिशा दाखवतील याची खात्री आहे म्हणून त्यांची निवड केल्याचे केंद्रीय अध्यक्ष विष्णू भंगाळे यांनी सांगितले. दरम्यान, सर्वच समाजातील युवकांना संघटीत करून असंख्य युवक कार्यकर्त्यांची एक फळी तयार करणार आहे. समाजातील थोर पुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या युवकांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने एक वेगळी दिशा देऊन प्रगतीची नवीन वाट निर्माण करून देण्याचा प्रयत्न करू, असे प्रा.धीरज पाटील म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !