सावदा शहराच्या विकासासाठी कटीबद्ध : पालकमंत्री गुलाबराव पाटील


खंडेराव देवस्थान सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा : मंत्री पदाचा हवा कधीही डोक्यात जावू देणार नाही

सावदा : विकासकामे करताना कधीही जात वा धर्म पाहिला नाही शिवाय व्यक्ति कोणत्या पक्षाचा आहे हे न बघता आपण विकास कामांसाठी आपण सदैव निधी देत आलो असून यापुढेही देत राहू, अशी ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे दिली. ते म्हणाले की, मी रस्त्यावरचा माणूस आहे कधीही मंत्री पदाची हवा डोक्यात जाऊ देणार नाही. आपण नेहमी सर्वसामान्यांमध्येच राहून केले असून सावदा शहराच्या विकासासाठी कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले. सावदा शहर व परीसरातील भक्त गणाचे श्रद्धास्थान असलेल्या पुरातन खंडोबा देवस्थानाच्या (मंदिर) सभामंडपाचा भूमिपूजन सोहळा रविवारी पालकमंत्र्यांच्याहस्ते झाला. प्रसंगी ते बोलत होते.

आमदारांच्या पाठपुराव्याने कामाला सुरूवात
सावदा शहरात पुरातन कालापासून खंडोबा, म्हाळसा व बानु देवी यांचे मंदिर स्थित आहे. हे मंदिर परीसरातील लोकांचे कुलदैवत सुद्धा आहे. या ठिकाणी सभामंडप नसल्याने, भाविकांची राहण्याची व्यवस्था नसल्याने भाविकांना त्रास होत होता. याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या लक्षात ही बाब आणून दिल्यानंतर जिल्हा नियोजन मंडळात अध्यक्ष असलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आमदारांनी शब्द टाकल्यानंतर खंडेराव मंदिर संस्थानासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. रविवारी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे यांच्या उपस्थितीत पालकमंत्री पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, सावदा शहरासाठी विविध विकासकामे मंजूर केली असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध झाला असल्याचे ते म्हणाले.




यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमास सावदा नगराध्यक्षा अनिता येवले, नगरसेवक राजेंद्र चौधरी, फिरोज खान पठाण, शिवसेना उपतालुका प्रमुख धनंजय चौधरी, तालुका उपाध्यक्ष योगीराज पाटील, शिवसेना शहरप्रमुख सुरज परदेशी, भरत नेहते, शाम पाटील, शरद भारंबे, राहुल पवार, नंदू पाटी, स्वामीनारायण मंदिरातील स्वामी धर्म प्रसाद दासजी, रावेरचे माजी नगराध्यक्ष महाजन, सावदा नगरपालिका मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सहा.पोलीस निरीक्षक देविदास इंगोले, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार तसेच मान्यवर व भक्तगण उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !